Lakshmi Hebbalkar: ‘ग्रामीण‌’मध्ये सात वर्षांत 150 मंदिरे

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : किणयेत लक्ष्मी मंदिराचे भूमिपूजन, 50 लाखांचा निधी
Lakshmi Hebbalkar
Lakshmi Hebbalkar: ‘ग्रामीण‌’मध्ये सात वर्षांत 150 मंदिरेPudhari
Published on
Updated on

बेळगाव : गेल्या सात वर्षांत ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 150 मंदिरांची उभारणी केली आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक गावात विकासकामे राबविण्यात येत आहेत. येत्या काळात सर्वांच्या सहकार्याने बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आदर्श बनविण्यात येईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

किणयेतील (ता. बेळगाव) लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन कार्यक्रम गुरुवारी (दि. 12) मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. गावकऱ्यांनी लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार केला आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या मागणीनुसार मंदिरासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याठिकाणी सुंदर मंदिर उभारण्यात येईल. ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण करावे. तसेच काम दर्जेदार करावे. जेणेकरुन या मंदिरांची ख्याती सर्वदूर पोचेल, अशी सूचना त्यांनी केल्या.

तत्पूर्वी, मंत्री हेब्बाळकर यांनी गावातील महिलांच्या साथीने कुदळ मारुन मंदिराच्या पायाखोदाईला चालना दिली. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, मारुती पाटील, बाळू देसूरकर, मारुती डुकरे, मधुकर पाटील, हेमंत पाटील, निंगाप्पा पाटील, नानू पाटील, जयवंत पाटील, अप्पुराय गुरव, भैरु डुकरे, पुण्णाप्पा दळवी, कल्लाप्पा नाईक, वीर पाटील, विनायक पाटील, राजेंद्र पाटील, कृष्णा गुरव, लक्ष्मण सातेरी, कृष्णा पाटील, विठ्ठल पाटील, राजू पाटील, विलास पाटील, आशिष पाटील, निवृती डुकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news