

बंगळूर : गेल्या अनेक दिवसांपासून रख़डलेली बस तिकीट दरवाढीची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. बस तिकीट दरात 15 टक्के वाढीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास असून पुरुषांना मात्र वाढीव तिकीट दराने प्रवास करावा लागणार आहे. हा दर येत्या रविवारपासून (दि. 5) लागू असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षांनंतर पहिल्यांदा तिकिटाचे दर वाढणार आहेत.