Income Tax Fraud : खोट्या कागदपत्रांद्वारे सरकारलाच कराचा चुना

१४४१ जणांनी मिळवला ११० कोटींचा आयकर परतावा
Income Tax
Income TaxPudhari
Published on: 
Updated on: 

बंगळूर : बनावट कागदपत्रे सादर करून आयकर परतावा मिळविण्याचा प्रयत्न केल्याची १,४४१ गंभीर प्रकरणे आयकर विभागाने राज्यात उघडकीस आणली आहेत. या माध्यमातून सुमारे ११० कोटी रुपयांचा आयकर परतावा मिळविण्यात आला आहे.

आयकर विभागाने संशयित करदात्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. परताव्यासाठी केलेल्या दाव्यांबाबत योग्य स्पष्टीकरण देण्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आयकर विवरणपत्रांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर सवलती आणि परताव्याचे दावे करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे अशा प्रकरणांना उच्च जोखमीची किंवा गंभीर प्रकरणे म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. उघडकीस आलेल्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ९० टक्के प्रकरणे पगारदार कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.