सौंदत्ती यल्लमा देवीच्या दर्शनाहून परतताना ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; १४ भाविक जागीच ठार

सौंदत्ती जवळ भीषण अपघात; १४ भाविक ठार
14 people died on the spot in a terrible accident near Saundatti
सौंदत्ती जवळ भीषण अपघातात; १४ भाविक ठारPudhari Photo

बेळगाव पुढारी वृत्तसेवा

सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणार्‍या भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला पडल्‍याची दुर्देवी घटना समोर आली आहे. भाविकांच्या ट्रॅव्हलरने थांबलेल्‍या ट्रकला भीषण धडक दिली. यामध्ये १४ भाविकांचा जागीच मृत्‍यू झाला.

14 people died on the spot in a terrible accident near Saundatti
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज; घोषणांचा पाऊस पडणार

थांबलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक बसून 14 जण जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहळी येथे घडली. सर्व मृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आहेत. मृतांमध्ये परशुराम (वय 45) भाग्या (40) नागेश (50) विशालाक्षी (40), अर्पिता (18) सुभद्राबाई (65), पुन्या (50), चालक आदर्श (23), मानस (24), रूपा (40) मंजुळा (50) यांच्यासह अन्य महिला पुरुष व मुलांचा समावेश आहे.

14 people died on the spot in a terrible accident near Saundatti
CM Eknath Shinde|उद्धव ठाकरे यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर पोहोचणार नाही

याबाबतची अधिक माहिती अशी की, हावेरी जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नागेश यम्मेहट्टी यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी नवीन टेम्पो ट्रॅव्हलर खरेदी केला आहे. त्यामुळे आपले नातेवाईक व शेजाऱ्यांना घेऊन ते नवीन वाहनाची पूजा करण्यासाठी सोमवारी 24 जून रोजी टेम्पो ट्रॅव्हलर भरून सर्वजण गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोळी येथील मायम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे पूजा करून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिराला गेले. गेल्या चार दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी रात्री या सर्वांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमाचे दर्शन घेतले. तेथून ते पुन्हा आपल्या गावी परतत होते.

14 people died on the spot in a terrible accident near Saundatti
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज; घोषणांचा पाऊस पडणार

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहळी क्रॉसजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकचा ट्रॅव्हलर चालक आदर्श याला अंदाज आला नाही. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलरची रस्‍त्‍याच्या कडेला थांबलेल्‍या ट्रकला जोरदार धडक बसली. यामध्ये 13 जण जागीच ठार झाले तर एकाचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. अन्य तिघा जणांची ही प्रकृती गंभीर असल्याचे हावेरी पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच हावेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news