

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तेलगाव रस्त्यावर आज (दि. २३) दुपारी ट्रॅक्टर व टिप्परचा भीषण अपघात झाला. यात एक ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर माजलगावकडून तेलगाव रस्त्याला भरधाव वेगात असणाऱ्या टिप्परने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एक ठार तर दोन जण जखमी झाले.