Hyundai Creta : ह्युंदाई क्रेटाचे 'हे' मॉडेल कायमचे बंद! | पुढारी

Hyundai Creta : ह्युंदाई क्रेटाचे 'हे' मॉडेल कायमचे बंद!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात ह्युंदाई क्रेटाचे (Hyundai Creta) गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीच्या सर्वात प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट मधील क्रेटा हे मॉडेल आहे. कंपनीने बऱ्याचदा याच्या विविध मॉडेलमध्‍ये सुधारणा देखील केल्या आहेत. काही विशेष अशा सर्वच मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरल्‍या आहेत. मात्र कंपनीने सध्या क्रेटाचे एक मॉडल बंद करत असल्याची माहिती दिली आहे.

ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) या कॉम्पॅक्ट SUV मॉडेलच्या पेट्रोल प्रकारातील सुमारे १० मॉडेल आहेत. यामधील 1.5 MT SX Executive हे मॉडेल बंद करण्याचे कंपनीने घोषित केले आहे.  ह्युंदाई कंपनीकडून ही कार बंद करण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पण कंपनीने काही व्हेरिअंटमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे. यापैकी, E, EX, S, S+ Night, SX, SX (O) हे सुधारणा करण्यात येत असलेले व्हेरिअंट आहेत.

ह्युंदाई क्रेटा SX Executive मॉडेल का केले बंद?

क्रेटा 1.5 MT SX Executive या मॉडेलला जून 2021 मध्ये रि-लॉन्च करण्यात आले होते. या लॉन्चिंग दरम्यान ऑटोमोबाईल क्षेत्र काही पार्ट मिळत नसल्याने संकटात सापडलेले होते. मात्र बाजारपेठेत ऑटोमोबाईल क्षेत्रातील उपकरणांमध्ये तुटवडा जाणवून येत नाही. त्यामुळेच सध्या कंपनी काही नवे व्हेरिअंट लॉन्च करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावेळेस या कारमध्ये फिचर्सच्या कमरता देखील होत्या. SX Executive मध्ये टचस्क्रीन, कनेक्टिविटी, कारप्ले, अँड्रॉईड ऑटो, साऊंड सिस्टिम, बर्गलर अलार्म या फिचर्स थोडीशी तफावत जाणवत होती. त्‍यामुळे हे मॉडेल बंद करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

ह्युंदाई क्रेटाची पेट्रोल व्हेरिअंट

1.5 MT E, 1.5 MT EX, 1.5 MT S, 1.5 MT S+ Knight, 1.5 MT SX Executive, 1.5 MT Sx, 1.5 IVT SX, 1.5 IVT SX (0), 1.5 IVT SX (0) Knight, 1.4 DCT SX (0)

हेही वाचा : 

Back to top button