file photo
Latest
Kazakhstan mine fire : कझाकिस्तानच्या खाणीत लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू
पुढारी ऑनलाईन ; कझाकिस्तानमध्ये Kazakhstan mine fire खाणीत लागलेल्या आगीत किमान १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. खाण चालवणाऱ्या लक्झेंबर्गस्थित पोलाद उत्पादक कंपनीच्या स्थानिक युनिट आर्सेलर मित्तल तेमिरताऊ यांनी आज (शनिवार) या विषयी सांगितले.
या घटनेतील अठरा जणांना वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. Kazakhstan mine fire कोस्टेन्को खाणीतील 252 लोकांपैकी 205 लोकांना बाहेर काढण्यात आले होते. 31 जण सकाळी 10 वाजेपर्यंत सापडले नव्हते, असे कंपनीने म्हटले आहे.
कझाकिस्तानचे अध्यक्ष Kazakhstan mine fire कॅसिम-जोमार्ट तोकायेव, यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळाला आर्सेलर मित्तल तेमिरताऊ यांच्याशी गुंतवणूक सहकार्य थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :

