

पुढारी ऑनलाईन : 'गेट वेल सून' या शुभेच्छा अभिनेत्री, 'बिग बॉस' फेम आरती सिंहला ( Arti Singh ) तिचे चाहते देत आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती टीव्हीवर तिची भूमिका असलेली सीरियल बनताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना आरतीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'हा आठवडा माझ्यासाठी सोपा नव्हता. माझ्या कठीण प्रसंगी एक होता. माझ्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली, काच फुटली आणि हातात घुसली. ती काढण्यासाठीच सर्जरी करण्यात आली.' खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे आरती सिंह चर्चेत आहे. तिने वजन कमी केले आहे. त्यानंतर तिचा आत्मविश्वास खूप वाढला. तो तिच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये दिसतो. आता आरती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे; पण आता ती रुग्णालयात दाखल आहे.
काही दिवसांपूर्वी तिचा ( Arti Singh ) अपघात झाला होता. तिच्या हाताला दुखापत झाली होती. आरती तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना तिच्या हातून चुकून एक काचेचा ग्लास फुटला. तेव्हा तिने तिच्या दुखापतीकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, रात्री घरी पोहोचल्यानंतर तिचा हात दुखू लागला. सकाळपर्यत वेदना बरी न झाल्याने ती डॉक्टरकडे गेली. जिथे तिच्या हातात काचेचे ७ छोटे तुकडे अडकल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते काचेचे तुकडे काढण्यात आले आणि जखमा इतक्या खोल होत्या की, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी आरतीला ६ टाके घलण्यात आले.