Zombie Snake : हा आहे ॲक्टिंग करणारा साप!

Namdev Gharal

हो तुम्ही बरोबर वाचले आहे, सरपटणाऱ्या जिवांमध्ये एक साप असाही आहे जो धोका दिसला की ॲक्टींग करतो

या सापाला झोंबी साप म्हटले जाते पण याचे खरे नाव हॉगनोज स्नेक आहे, याचे नाक थोडे वर वळलेले असते त्‍यामुळे याला हॉगनोज म्हणतात. शरीरावर गडद ठिपके

याच्या अभिनय करण्याच्या प्रकारामुळे त्‍याला हे zombie snake असे टोपण नाव पडले आहे. हा समोरच्याला घाबरवण्यासाठी वेगवेळ्या सापांचा अभिनय करतो

हा सौम्य विषारी साप असतो, मानवाला कोणताही धोका नसतो. पण याला जर धोका दिसला तर नागासारखा दिसण्यासाठी मानेचे स्नाचू फैलावतो.

तसेच मान उंच करुन मोठ्याने फुसफसणे, मोठे तोंड करणे मानेचे स्नायु फुगवने असे अनेक अभिनय करतो. जेणेकरुन समोरचा प्राणी घाबरेल व पळून जाईल

हे करुनही जर समोरचा शत्रू घाबरला नाही तर हा चक्क मेल्याची ॲक्टिंग करतो हा अचानक उलटा पडतो, तोंड उघडतो, जीभ बाहेर काढतो मेल्यासारखा पडून राहतो.

याला इंग्रजीत Thanatosis, हे दृश्य अगदी “झॉम्बी” सारखे वाटते यावरुन लोकांनी याचा Zombie Snake असे नाव दिले

याचे विष हे मानवासाठी धोकादायक नसते याचे विष हे लहान किटक, छोट्या शिकारीसाठी तो याचा वापर करतो.

हा साप प्रामुख्याने उत्तर अमेरिका (अमेरिका, कॅनडा) येथे आढळतो. मुख्यत्वे अमेरिकेच्या पूर्व भागात जंगल, ओलसर क्षेत्र, गवताळ प्रदेशात याचा वावर असतो

बेडूक, लहान सरडे, कीटक क्वचित लहान उंदीर असा याचा आहार असतो, रंग: राखाडी, तपकिरी, कधीकधी ऑलिव रंगाचा असतो

Most Dangerous Snake | भारतातातील प्रमूख चार विषारी सांपापैकी ‘हा’ आहे माणसासाठी सर्वात घातक, दंशही असतो मुंगी चावल्यासारखा