Most Dangerous Snake | भारतातातील प्रमूख चार विषारी सांपापैकी ‘हा’ आहे माणसासाठी सर्वात घातक, दंशही असतो मुंगी चावल्यासारखा

Namdev Gharal

भारतात नाग, घोणस, फुरसे व मण्यार या प्रमुख चार विषारी सापांच्या प्रजाती आढतात. यापैकी नाग हा सर्वपरिचित आहे. तसेच त्‍याच्या फणा काढण्यामुळे तो अधिक धोकादायक वाटतो

पण विषाचा मानवी शरिरावर होणाऱ्या परिणामाचा विचार केला तर नाग हा चारपैकी तिसऱ्या स्थानी येतो. तर मग सर्वात घातक कोण ठरते

तर या चार बिग फोर सापांपैकी माणसांला सर्वात धोका असतो तो. मण्यार या छोट्या सापाचा व त्‍यानंतर धोकादायक ठरतो तो म्हणजे घोणस या सापाचा

मण्यार (Common Krait) या सापाचे विष हे न्युरोटॉक्सिक (Neurotoxic) या प्रकारात मोडते. याचा परिणाम थेट मज्जासंस्थेवर होतो.

तसेच हळूहळू स्नायूंमधील शक्ती कमी होत जाते. पापण्या न उघडणे, बोलता न येणे, श्वास घेता न येणे (Respiratory paralysis) अशी लक्षणे दिसून माणसाचा मृत्‍यू होऊ शकतो.

याचे वैशिष्ट्ये म्हणजे याचा चावा हा बहुतेक वेदनारहित असतो, अगदी मुंगी चावल्यासारखा, सूज कमी असते त्यामुळे अनेक लोक दुर्लक्ष करतात व जीवास मुकतात.

याची दुसरी धोकादायक गोष्ट म्हणजे हा निशाचर असतो. बऱ्याचवेळा रात्री झोपेत चावा घेतल्यास लक्षणे दिसेपर्यंत उशीर होतो.

मण्यार चावल्यानंतर ४–८ तासांत श्वसन बंद पडू शकते तसेच उपचार न मिळाल्यास मृत्यू ६–१२ तासांत होण्याची शक्यता असते. गंभीर केसेसमध्ये २–३ तासातही मृत्यू होऊ शकतो.

यानंतर येते ते म्हणजे घोणस (Russell’s Viper) याचे विष हे रक्त बिघडवणारे असते , सूज व वेदना खूप होतात व रक्त गोठते, उपचार न मिळाल्यास 8 ते 24 तासात मृत्‍यू होतो.

यानंतर तिसऱ्या स्थानी नाग येतो याचे विषामुळे स्नायूमधील ताकत कमी होते, गिळणे व श्वसन बंद होते. उपचार वेळेत न मिळाल्यास 6 ते 12 तासांच्या आत माणसाचा मृत्‍यू होऊ शकतो.

चौथ्या स्थानी फुरसे येते याचे विष हे रक्तावर परिणाम करणारे असते. वेदना सूज व टिशू डॅमेज होतात वेळेत उपचार न मिळाल्यास रक्तस्त्राव व शॉकमूळे 12 ते 14 तासांमध्ये मृत्‍यू होऊ शकतो.

Brazilian Rainbow Boa| इंद्रधनुष्यासारखे सात रंग बदलणारा साप!