Namdev Gharal
हो हे अगदी सत्य आहे. होंडूरास या दक्षिण अमेरिकेतील देशात योरो Yoro नावाचे एक शहर आहे. याठिकाणी मे व जून महिन्यात चक्क जिवंत माशांचा पाऊस पडतो
याठिकाणी कोणताही समुद्र किंवा तलाव नाही पण या शहरात ज्यावेळी वादळ येते त्यावेळी रस्त्यांवर अक्षरशा माशांचा खच पडलेला असतो. तडफडणारे मासे अनेकजण गोळा करुन नेतात
या नैसर्गिक चमत्काराला स्थानिक भाषेत 'Lluvia de Peces' असे म्हणात याचा अर्थ आहे पाण्यातून पडणारा माशांचा पाऊस
वैज्ञानिकांच्या मते समुद्रावर किंवा मोठ्या जलाशयावर जेव्हा शक्तिशाली चक्रीवादळे तयार होतात, तेव्हा ती पाण्यातील माशांना ओढून आकाशात नेतात. हेच मासे पावसाबरोबर खाली पडतात पण योरो हे समुद्रापासून लांब आहे.
दुसरीकडे नॅशनल जिओग्राफिकच्या संशोधकांनी १९७० मध्ये एक वेगळा तर्क मांडला होता. त्यांच्या मते, योरोच्या जमिनीखाली अनेक गुहा आणि भूमिगत नद्या आहेत.
जेव्हा प्रचंड पाऊस पडतो, तेव्हा या नद्यांना पूर येतो आणि पाण्याच्या दाबाने जमिनीखालील मासे बाहेर फेकले जातात. पाऊस थांबल्यानंतर हे मासे जमिनीवरच अडकून पडतात.
स्थानिक लोक याला 'फादर सुबिराणा' (Father José Manuel Subirana) यांचा चमत्कार मानतात. यासाठी एक कथाही सांगितली जाते
१८६० च्या काळात येथे खूप गरीबी आणि भूकमारी होती. तेव्हा फादर सुबिराणा यांनी गरिबांना अन्न मिळावे म्हणून देवाकडे तीन दिवस प्रार्थना केली होती. तेव्हापासून हा माशांचा पाऊस पडत असल्याची लोकांची श्रद्धा आहे
लोकांची श्रद्धा की वैज्ञानिक कारण याचा अजूनही योग्यरित्या शोध झालेला नाही. पण हा पडणार माशांचा पाऊस मात्र निसर्गाचा मोठा चमत्कारच आहे.