Camel Hump | उंटाच्या कुबडामध्ये खरचं पाणी साठलेले असते का? काय आहे सत्‍य!

Namdev Gharal

आपल्याला लहानपनापासून माहिती आहे की उंट हा वांळवंटातील जहाज आहे आणि तो खूप दिवस पाण्याशिवाय राहू शकतो.

उंटाच्या पाठीवर जे कुंबड असते त्‍यामध्ये तो पाणी साठवून ठेवतो व गरजेप्रमाणे वाळवंटात प्रवास करताना शरीराची तहान भागवतो

पण उंटाच्या पाठीवर जे कुबड असते ते कधीही पाणी साठवण्यासाठी बनलेले नसते. तर ते कुबड हे निव्वळ त्‍याच्या चरबीपासून बनलेले आहे.

जेव्हा उंटाला कित्येक दिवस अन्न मिळत नाही, तेव्हा त्याचे शरीर या कुबडामधील चरबीचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी उंट करत असतो.

मग पाण्यासाठी उंट काय प्रणाली वापरतोःउंट ज्यावेळी पाणी पितो त्‍यावेळी तो 100 ते 150 लिटर पाणी एकाचवेळी पितो. यावेळी उंटाच्या रक्तातील पेशींची रचना अशी असते की त्‍या पाणी शोषूण घेतात.

उंटाच्या रक्तातील पेशी (Red Blood Cells) अंडाकृती असतात. त्‍या पाणी शोषूण घेतात व शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवतात. त्‍यामुळे उंटाला खूप दिवस पाण्याची गरज लागत नाही

तसे कडक उन्हात वाळवंटातून उंट प्रवास करत असेल तर कमीत कमी 15 दिवस उंट पाणी न पिता राहू शकतो. त्‍याच्या रक्तातच पाण्याचे प्रमाण असल्याने, शरीरात ओलावा टिकून राहतो

तसेच जर उंटाला हिरवा चारा मिळत असेल तर उंट 4 ते 5 महिने पाण्याशिवाय राहू शकतो. हिरव्या चाऱ्यातून तो शरिराची पाण्याची गरज भागवतो.

दुसरी गोष्ट म्हणजे उंटाचे शरीर पाणी वाया घालवत नाही. त्यांना घाम अत्यंत कमी येतो आणि त्यांचे मुत्र खूप घट्ट असते. अगदी त्यांच्या शेणामध्येही पाण्याचा अंश नसतो.

दिवसभर 10,000 वेळा झाडावर चोच मारुनही सुतारपक्ष्याचा मेंदू सुरक्षित कसा राहतो ?