मोनिका क्षीरसागर
पचनावर विपरीत परिणाम
जेवल्यानंतर लगेच व्यायाम केल्याने रक्ताभिसरण पचनसंस्थेकडे न जाता स्नायूंकडे वळते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते.
मळमळ आणि उलट्या
भरल्या पोटी योगासने किंवा व्यायाम केल्याने पोटात जडपणा जाणवून मळमळणे किंवा उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.
पेटके येण्याची शक्यता
पोट भरलेले असताना शारीरिक हालचाल केल्यास पोटाच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना किंवा 'क्रॅम्प्स' (पेटके) येऊ शकतात.
ऊर्जेचा अभाव
शरीर अन्नाचे पचन करण्यात व्यस्त असल्याने, तुम्हाला व्यायामासाठी आवश्यक असलेली पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि लवकर थकवा येतो.
किती वेळ थांबावे?
साधारणपणे जड जेवण केल्यानंतर किमान ३ ते ४ तासांनी व्यायाम किंवा योगासने करणे आरोग्यासाठी हिताचे ठरते.
हलका नाश्ता असेल तर?
जर तुम्ही हलका नाश्ता केला असेल, तर किमान १ ते २ तासांच्या विश्रांतीनंतर तुम्ही योगासने करू शकता.
वज्रासन हा एकमेव पर्याय
योगासने रिकाम्या पोटी करणे सर्वोत्तम असते, मात्र 'वज्रासन' हे एकमेव असे आसन आहे जे तुम्ही जेवल्यानंतर करू शकता.
आरोग्याची काळजी घ्या
चुकीच्या वेळी केलेला व्यायाम फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतो, त्यामुळे वेळेचे भान ठेवूनच फिटनेसचे नियोजन करा.