रात्रीच्या वेळी दही ताक न खाण्याचा सल्ला दिला जातो; यामागे नेमकं कारण काय?

मोनिका क्षीरसागर

रात्री दही-ताक खाणे योग्य की अयोग्य?

आयुर्वेदानुसार आणि आहारतज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी दही किंवा ताक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

curd & food combinations

कफ दोष वाढतो

दही चवीला आंबट आणि स्वभावाने 'अभिस्यंदी' (स्त्रोतस अडवणारे) असते, ज्यामुळे रात्री शरीरात कफ दोष वाढण्याची शक्यता असते.

पचनास जड

दही पचायला जड असते. रात्री आपली चयापचय क्रिया (Metabolism) मंदावलेली असल्याने दह्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.

श्वसनाचे विकार

रात्री दही खाल्ल्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकला किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींना श्वसनाचा त्रास अधिक जाणवू शकतो.

सांधेदुखीची भीती

ज्यांना सांधेदुखी किंवा वात व्याधी आहेत, त्यांनी रात्री दही खाल्ल्यास सांध्यांमध्ये सूज किंवा वेदना वाढू शकतात.

त्वचेच्या समस्या

पित्त आणि कफ बिघडल्यामुळे रात्री दही खाल्ल्याने पिंपल्स किंवा त्वचेवर खाज येण्यासारखे त्रास उद्भवू शकतात.

पर्याय काय

जर तुम्हाला रात्री दही खायचेच असेल, तर त्यात चिमूटभर काळी मिरी पूड किंवा सैंधव मीठ मिसळून खावे, ज्यामुळे त्याचे दुष्परिणाम कमी होतात.

तज्ज्ञांचा सल्ला

शक्यतो दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करणे सर्वोत्तम आहे, कारण सूर्यप्रकाशात ते सहज पचते.

येथे क्लिक करा...