अंजली राऊत
दोन सफरचंद, एक चमचा बडीशेप, दोन लसूण पाकळ्या, एक चमचा कलोंजी, कढीपत्ता, एक चमचा तेल, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, गुळाचा छोटा तुकडा
स्टेप 1 : सर्वात पहिले दोन सफरचंद घ्या आणि त्यांना स्चच्छ पाण्याने धुवा. सुती कापडाने पुसून टाका त्यानंतर पूर्णपणे सोलून घ्या. सोलल्यानंतर, सफरचंदांचे लहान तुकडे करा
स्टेप 2 : गॅस सुरु करुन त्यावर एक खोल पॅन ठेवा. पॅन गरम झाल्यावर, एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यावर, एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, दोन लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घाला.
स्टेप 3: जेव्हा जिरे तडतडायला लागते तेव्हा त्यात बारीक चिरलेले सफरचंद घाला आणि नीट ढवळून घ्या. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
स्टेप 4 : थोड्या वेळाने पुन्हा ढवळा. जेव्हा ते थोडे वितळू लागते तेव्हा त्यात काही गुळाचे तुकडे आणि चिमूटभर मीठ घाला. पुन्हा चांगले मिसळा. गॅसचा आच कमी ठेवा.
स्टेप 5: सफरचंद पूर्णपणे मऊ होईपर्यंत काही मिनिटे थांबा. ते चांगले शिजल्यानंतर, पुन्हा चांगले ढवळा. आता तुमची सफरचंदाची चटणी तयार असून गरमागरम सर्व्ह करा.
सफरचंद खाण्याचे फायदे म्हणजे ते पचन सुधारते, हृदयाचे आरोग्य वाढवते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि वजन मेंटेन करण्यास मदत करते. सफरचंद फायबरचा एक चांगला स्रोत असून त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात.