Yedi Babhul | येडी बाभळीचा वाढता विळखा; काटेरी झाड का ठरतेय धोकादायक?

पुढारी वृत्तसेवा

येडी बाभूळ’ हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काटेरी वनस्पतीसाठी वापरला जाणारा प्रचलित असलेला स्थानिक नावाचा प्रकार आहे

‘येडी बाभूळ’ हे नाव ‘विलायती बाभूळ’ (Prosopis juliflora) यासाठी वापरलेले आढळते

या झाडाचे शास्त्रीय नाव Prosopis juliflora असून कुळ Fabaceae (शिंबावंत/लेग्युमिनोसी) तर प्रचलित नावे विलायती बाभूळ, मेस्किट, Prosopis असे आहे

ही काटेरी, अत्यंत तगडी आणि कमी पाण्यातही वाढणारी झुडूपवजा किंवा मध्यम आकाराची वनस्पती आहे

महाराष्ट्रातील कोरडवाहू भाग, गायरान, रस्त्यांच्या कडेला, पडिक जमीन आणि कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात ती मोठ्या प्रमाणात दिसते

Prosopis juliflora ही भारतीय उपखंडातील मूळ वनस्पती नसून अमेरिकन खंडातील प्रदेशातून आलेली प्रजाती आहे

भारतात तिची लागवड प्रामुख्याने इंधनासाठी लाकूड, हिरवळ आणि जमिनीची धूप रोखण्यासारख्या उद्देशांनी करण्यात आली

या झाडामुळे जनावरांसाठी उपलब्ध असलेले गवत कमी होऊ शकते, काट्यांमुळे जनावरांना इजा होऊ शकते, शेतजमिनीवर तिचा प्रसार झाल्यास मशागत करणे कठीण होते. स्थानिक वनस्पतींशी तिची स्पर्धा वाढते

झाडे तोडून टाकल्यानंतर पुन्हा फुटण्याची समस्या येऊ शकते. तसेच या झाडाची मुळे जमिनीत ५० ते ६० फूट खोल जातात त्यामुळे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेते

येथे क्लिक करा