Rahul Shelke
या वर्षी भारत आणि जगभरातील अनेक घटनांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. काही मन हेलावणाऱ्या, काही प्रेरणादायी घटना घडल्या. या घटनांचे फोटो व्हायरल झाले होते.
शुभांशु शुक्लांच्या फोटोने जगाचं लक्ष वेधलं आणि भारताची मान उंचावली.
या भीषण अपघातात 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. विमान हॉस्टेल बिल्डिंगवर कोसळल्याने जीवितहानी झाली. हा फोटो वर्षातील सर्वात दुःखद फोटो आहे.
लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाजवळ बसलेली पत्नी हिमांशी. हा हृदय पिळवटून टाकणारा फोटो आहे.
कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी प्रेस ब्रीफिंगचे नेतृत्व केले. या फोटोने मेसेज दिला की, भारत एक आहे.
युद्धाच्या छायेत झालेल्या या भेटीचा फोटो जगभर चर्चेचा विषय झाला होता.
Gen Zची क्रांती; PM ओलींचा राजीनामा. भ्रष्टाचार आणि बॅनविरोधी आंदोलनात 76 जणांचा मृत्यू झाला. 12 सप्टेंबरला सुशीला कार्की पंतप्रधान बनल्या. आंदोलनाचा हा फोटो सर्वात चर्चेत होता.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला ODI वर्ल्ड कप. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील विजयानं 1983 चा क्षण पुन्हा जिवंत केला. भारतीय क्रीडा इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे.
या फोटोंमधून जग बदलताना दिसलं. यातील काही फोटो कायम लक्षात राहतील. तर काही फोटो कायम प्रेरणा देतील.