Rahul Shelke
पटना पुस्तक मेळ्यात 15 कोटी किंमतीचे पुस्तक ‘मैं’ (MAIN) चर्चेत आहे. पुस्तक पाहण्यासाठी साहित्यप्रेमींची प्रचंड गर्दी होत आहे.
रत्नेश्वर सिंह हे बिहारचे लेखक, पत्रकार आणि मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. ते 20हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.
लेखकाने आध्यात्मिक साधनेतून "ज्ञानाची परम अवस्था" याचा शोध घेतला आहे. ही अवस्था किती मौल्यवान आहे हे जाणून त्यांनी पुस्तकाची किंमत 15 कोटी ठेवली आहे.
‘मैं’ ग्रंथाच्या जगभरात केवळ तीन प्रती आहेत.
मानवाच्या ज्ञान प्राप्तीची सर्वोच्च अवस्था म्हणजे काय, ती कशी मिळते आणि तिचे रहस्य काय, हे या पुस्तकात सांगितलं आहे.
महायुग त्रयी, रेखना मेरी जान ही ग्लोबल वॉर्मिंगवरील पहिली हिंदी कादंबरी, जीत का जादू, मीडिया लाइव टीव्ही शो 'मानो या ना मानो'चे स्क्रिप्ट लेखक.
भारत सरकारचा पत्रकारिता विषयक राष्ट्रीय पुरस्कार, विक्रमशिला विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, पत्रकारिता व अध्यापन क्षेत्रात दीर्घ अनुभव
भारत सरकारच्या भारतेन्दु हरिश्चंद्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
पुस्तक मेळ्यात ‘मैं’ ग्रंथाचे प्रदर्शन करताना लेखकाने स्वतः या पुस्तकाचा प्रवास सांगितला.