यशस्वी जैस्वालकडून कसोटी क्रिकेटमध्‍ये दिग्गजांचा विक्रम मोडित...

पुढारी वृत्तसेवा

टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात जैस्वालने कसोटी क्रिकेटमधील २००० धावांचा टप्पा ओलांडला.

भारताकडून सर्वात जलद २००० कसोटी धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत त्याने राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

२१ सामने आणि ४० डावांमध्‍ये त्‍याने दोन हजार धावांचा टप्‍पा पूर्ण केला आहे.

वयाच्या २३ वर्षे आणि १८८ दिवसांत हा टप्पा गाठणारा जैस्वाल, महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.

सचिनने वयाच्या २० वर्षे आणि ३३० दिवसांत ही कामगिरी केली होती.

जैस्‍वालने विजय हजारे, गौतम गंभीर आणि सुनील गावसकर यांसारख्या अनेक भारतीय दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी दुसर्‍या डावात जैस्वालने २२ चेंडूंतील २८ धावांची खेळी केली.

एजबॅस्‍टन कसोटीतील पहिल्‍या डावात जैस्वालचे शतक अवघ्या १३ धावांनी हुकले होते.

येथे क्‍लिक करा.