टीम इंडियाला 'या' मैदानांवर विजयाची प्रतीक्षाच..! कॅप्टन गिलला अनोख्या विक्रमाची संधी
पुढारी वृत्तसेवा
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून (दि.२ जुलै) बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे.
टीम इंडियाने जगभरातील मैदानांवर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
आजही जगात पाच मैदाने अशी आहेत जिथे भारताने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
गयानातील बोर्डा, जॉर्जटाउन मैदानावर भारताने ६ सामने खेळले असून सर्व अनिर्णित राहिले आहेत.
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या ७ सामन्यांपैकी भारताने २ पराभूत ५ सामने अनिर्णित राहिले.
मँचेस्टर, ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारताने ९ कसोटी सामने खेळले. ४ मध्ये पराभव तर ५ अनिर्णित राहिले.
(Image source- X)
बार्बाडोस शहरातील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर ९ सामन्यांपैकी ७ पराभव, २ अनिर्णित राहिले.
बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत आठ कसोटी सामने झाले. इंग्लंडने ७ सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
आता एजबॅस्टन मैदानावर भारतीय संघाने विजय मिळवला तर शुभमन गिल या मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरू शकतो.
(Image source- X)
एजबॅस्टन मैदानावर टीम इंडियाने सामना जिंकला तर शुभमन गिल हा अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार ठरणार आहे.
(Image source- X)
येथे क्लिक करा.