Namdev Gharal
10. या मध्ये 10 व्या क्रमांकावर आहे Irish Wolfhound (आयरिश वुल्फहाउंड) हा एक मोठा कुत्रा असून याची उंची सर्वाधिक असते भारतीय रुपयांमध्ये याची किंमत 2. 2 ते लाख ते ₹3.4 लाख इतकी जाते
9 क्रमांकावर French Bulldog (फ्रेंच बुलडॉग) हा छोट्या आकाराचा आणि लोकप्रिय ब्रीड आहे. पण show-quality व डॉग शोमधील परर्फामर्समुळे, देखभाल यामुळे याची किंमत 3.2 लाख ते ₹6.4 लाख रुपये इतकी जाते
8. आठव्या स्थानी Canadian Eskimo Dog (कॅनेडियन एस्किमो डॉग) हा एक जुना आर्टिक्टक स्लेज कुत्रा आहे, आणि तो आज दुर्मिळ असल्याने याची किंमत सुमारे ₹4.8 लाख ते ₹6.4 लाख रुपयांपर्यंत जाते
7. Pharaoh Hound (फॅरोह हाउंड) सातव्या स्थानि असलेला मॉल्टा (Malta) देशाचा हा ऐतिहासिक ब्रीड आहे. त्याचा ग्रेसफूल लुक त्याला महाग बनवतात. सुमारे ₹2.4 लाख ते ₹5.2 लाख रुपये शौकीन याला मोजतात.
6.Rottweiler (रॉटवीलर) ही एक प्रसिद्ध ताकदवान ब्रीड आहे. शक्तिशाली आणि संरक्षक स्वभावाचा कुत्रा. show-line Rottweiler महाग असतात. सुमारे ₹6.4 लाख (अंदाजे) किंमत याला मिळू शकते
5. Azawakh पाचव्या स्थानी असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील ब्रीड आहे. ही दुर्मीळ प्रजाती आहे यामुळे किंमत वाढते. सुमारे ₹2.4 लाख ते ₹5.6 लाख इतकी सरासरी किंमत होते.
4.Chow Chow (चाऊ चाऊ) हा सुंदर कुत्रा चीनमधला जुना ब्रीड. त्यांची अगदी वेगळी काळी- निळी अशी जीभ असते. देखभाल आणि खान्यापिण्याचा खर्च देखील महाग आहे. याची सुमारे ₹2.4 लाख ते ₹8.8 लाख इतकी किंमत असते.
3. टॉप टेन मध्ये तिसऱ्या स्थानी Löwchen (लोव्हचेन / Little Lion Dog) हा “लहान सिंह” म्हणून ओळखला जातो. दुर्लर्भतेमुळे तो महाग आहे. सुमारे ₹4 लाख ते ₹6.4 लाख इतकी किंमत जाते.
2. या यादित दुसऱ्या स्थानी Samoyed (सॅमोएड) हा सायबेरीयन सुंदर कुत्रा येतो. याला सुंदर पांढरी अशी fluffy फर असते.याची “सॅमोएड स्माइल” प्रसिद्ध आहे. याची किंमतीची रेंज अंदाजे सुमारे ₹3.2 लाख ते ₹11.2 लाख पर्यंत जाते.
1. या यादीत सर्वाच्च स्थान Tibetan Mastiff (टिबेटन मॅस्टिफ) ने पटकावले आहे. काही डॉग शोमध्ये वेळा याची किंमत सुमारे ₹8–9 कोटी गेली आहे. मोठा आकार, सिंहासारखा मानेचा कोट यामुळे तो श्रीमंत वर्गात “स्टेटस सिम्बाल” आहे.