Cobra | पहा जगातील अंत्‍यत जहाल विषारी नांगांच्या प्रमुख 10 प्रजाती

Namdev Gharal

वैज्ञानिकांनी जगामध्ये विषारी असलेल्या नागांच्या 20 प्रजातींची यादी केली आहे. यामध्ये कोब्रा मुख्यत्वे Naja या वंशात येतात, तर King Cobra हा वेगळ्या Ophiophagus वंशात मोडतो. या प्रमुख 10 आहेत

1 Indian Cobra – भारतीय नाग हा नाग भारतातच प्रामुख्याने आढळतो, फणा काढताना चष्म्यासारखी खूण असून अत्यंत विषारी असते

2) King Cobra – या नागाला नागांचा राजा म्हटले जाते हा आकारने जगातील सर्वात लांब विषारी साप असून तो इतर साप खातो भारत, दक्षिण-पूर्व आशिया येथे आढळतो

3) Monocled Cobra – मोनोकल्ड कोब्रा भारताच्या ईशान्य भागासह बांगालादेश थायलंड येथे आढळणाऱ्या या नाच्या फण्यावर एक गोलाकार डाग (monocle) असतो.

4) Spectacled Cobra – चष्मेवाला नाग हा Indian cobra चाच एक प्रकार आहे, पण फणावर चष्म्यासारखा नक्षीदार पॅटर्न अधिक स्पष्ट असतो म्हणून याला हे नाव पडले आहे.

5) Egyptian Cobra – इजिप्शियन कोब्रा हा नाग प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये आढळतो याचा उल्लेख क्लिओपात्राच्या कथांमध्ये आला आहे. अत्‍यंत विषारी व काळ्या रंगाचा असतो

6) Forest Cobra – जंगल कोब्रा हा आफ्रिकेतील सर्व नागांच्या प्रजातींमध्ये सर्वात लांब कोब्रा असतो व आकारानेही मोठा असतो रंग काळा-पांढरा असा असतो.

7) Cape Cobra – केप कोब्रा दक्षिण आफ्रिकेत आढळणारा हा अत्यंत धोकादायक, जलद हल्ला करणारा म्हणून हा नाग ओळखला जातो याचा रंग हा पिवळसर असल्याने अत्‍यंत आकर्षक दिसतो

8) Chinese Cobra – चायनीज कोब्रा हा नाग चीन, व्हिएतनाम येथे आढळतो याचे विष अत्‍यंत जहाल असते. गडद काळा किंवा तपकिरी रंग ही याची ओळख

9) Philippine Cobra – फिलीपाईन कोब्रा हा फिलीपीन्स देशामध्ये आढळणारा प्रमुख नाग याचे विष श्वसन प्रणालीवर तीव्र परिणाम करते. "स्पिटिंग cobra" प्रकारात मोडतो

10) Spitting Cobras – विष फेकणारे कोब्रा, या प्रजातीमधील नाग हे फणा काढून विष थेट डोळ्यावर फेकू शकतात. ब्लॅक नेक, रेड, मोझांबिक स्पिटींग असे प्रकार येतात.

कोंबडा पहाटे सूर्योदयापूर्वीच बांग का देतोः काय आहे शास्त्रीय कारण?