Rahul Shelke
क्रिकेटमध्ये खेळाडू जितका मोठा, तितक्याच त्याच्या आठवणी मौल्यवान असतात. विशेषतः ज्या बॅटने ऐतिहासिक रेकॉर्ड केले आहेत त्या बॅटची किंमत जास्त असते.
अशा ऐतिहासिक बॅट्स लिलावात आल्या की त्यांची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. क्रिकेट इतिहासात अशा अनेक बॅट्स चर्चेचा विषय ठरत आहेत.
जगातील सर्वात महाग क्रिकेट बॅट ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमॅन यांची आहे.
डॉन ब्रॅडमॅन यांच्या या बॅटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
2021 मध्ये या बॅटचा लिलाव झाला. ही बॅट 2.45 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर, म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपयांना विकली गेली.
याच बॅटने ब्रॅडमॅन यांनी 1934 च्या Ashes Series मध्ये इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक रेकॉर्ड केले होते.
या बॅटनेच ब्रॅडमॅन यांनी हेडिंग्ले टेस्टमध्ये 304 धावा आणि 244 धावा केल्या होत्या.
ब्रॅडमॅन यांनी या दोन्ही रेकॉर्डचा उल्लेख स्वतः त्या बॅटवर लिहून ठेवला होता. म्हणूनच या बॅटची किंमत आणि महत्त्व वाढले.
ही बॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने ती स्वतःकडे न ठेवता ऑस्ट्रेलियातील डॉन ब्रॅडमॅन म्युझियमला दिली. आजही हजारो चाहते ही बॅट पाहायला जातात.
2011 वर्ल्डकप फायनलमध्ये एम. एस. धोनीने ज्या बॅटने विजयी षटकार मारला, ती बॅटही 1 ते 1.5 कोटी रुपयांना विकली. धोनीने ही संपूर्ण रक्कम साक्षी फाउंडेशनला दान केली.