Rahul Shelke
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. या संस्थेची ओळख म्हणजे तिची भव्य ऐतिहासिक इमारत.
मुंबई महापालिकेचे मुख्यालय या इमारतीत आहे. जागतिक वारसा यादीतील एक ऐतिहासिक वास्तू आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत मुंबईचं प्रतिनिधित्व करते.
ब्रिटिश काळात लोकसंख्या वाढू लागली. आरोग्य, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न वाढले. यातूनच 1889 साली मुंबई महापालिकेची स्थापना झाली.
या भव्य इमारतीचा आराखडा तयार केला फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स यांनी. त्यांनी गॉथिक वास्तुकलेला भारतीय (पौर्वात्य) शैलीची जोड दिली.
इमारतीचं प्रत्यक्ष बांधकाम रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली पूर्ण झालं.
रावसाहेब खंडेराव हे त्या काळातील सहाय्यक अभियंता होते. बांधकामाचा दर्जा, वेळ आणि खर्च यावर त्यांनी काटेकोर नियंत्रण ठेवलं. आजही इमारत टिकून आहे याचं श्रेय त्यांनाच जात.
25 एप्रिल 1889 रोजी बांधकामास सुरुवात झाली. 31 जुलै 1893 ला बांधकाम पूर्ण झाले. छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ ही इमारत उभारली आहे.
इमारतीची उंची 235 फूट आहे. एकूण खर्च ₹11.19 लाख झाला होता. अंदाजापेक्षा कमी खर्चात काम पूर्ण झालं होतं.
68 फूट लांब भव्य सभागृह, झुंबर, दालनं आणि ऐतिहासिक पुतळे, आयुक्त, महापौर आणि समित्यांची कार्यालयं या इमारतीत आहे.