World Coldest Citys | याठिकाणी जाणे म्हणजे हाडे गोठवून घेणे!

Namdev Gharal

याकुत्स्क (Yakutsk) – रशिया -40°C ते –50°C

जगातील सर्वात थंड वस्ती असलेले हे शहर सायबेरिया प्रातांत येथे. येथे लाखो लोक राहतात. यथे वाहनासांठी स्पेशल हिटींग सिस्टीम असते. येथील जमिन कायम गोठलेली असते.

ओयम्याकोन (Oymyakon) – रशिया –60°C पर्यंत

“World’s Coldest Inhabited Place” हे रशियातील एक छोटे गाव आहे याला जगाती सर्वात थंड राहण्याची जागा मानली जाते. याठिकाणी मायनस -71 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले आहे.

व्हर्कोयांस्क (Verkhoyansk) – रशिया –55°C

हे एक रशियातील असे शहर आहे याठिकाणी तापमानातील टोकाचा फरक दिसून येथो (उन्हाळा +30°C तर हिवाळ्यात -55 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाते.

नोरिल्स्क (Norilsk) – रशिया तापमान –40°C

हे एक औद्योगिक शहर, 8–9 महिने हिवाळा या शहरात सूर्यप्रकाश खूप कमी दिसते याला पोलर नाईट म्हणतात. याठिकाणी निकेल व कॉपरच्या खाणी आहेत. येथे पगार चांगला मिळतो कारण एस्ट्रिम कंडीशनमध्ये येथे काम करावे लागते.

येलोनाइफ (Yellowknife) – कॅनडा –35°C

कॅनडातील अगदी उत्तरेकडील हे शहर Northern Lights पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे हिवाळ्यात दिवस अगदी छोटे असतात काही वेळा 4 ते 5 तासांतच अंधार पडून जातो.

व्हाइटहॉर्स (Whitehorse) – कॅनडा तापमान –30°C

युकोन प्रदेशातील थंड शहर याठिकाणी अतिथंड वारे वाहतात त्‍यामुळे येथे थंडी अधिकच जाणवते. येथील तापमान उणे 30 डिग्रीपर्यंत जाते.

हार्बिन (Harbin) – चीन, 30°C

बर्फाच्या शिल्पांसाठी हे प्रसिद्ध शहर आहे याठिकाणी हिवाळ्यात होणाऱ्या फेस्टिवलसाठी जगभरातून पर्यटक येतात. महल व हॉटेलही पूर्ण बर्फात बनवलेली असतात.

उलानबातर (Ulaanbaatar) – मंगोलिया –35°C

जगातील सर्वात थंड राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते हिवाळ्यात याठिकाणी उणे 35 डिग्रीपर्यंत तापमान जाते. पारंपरिक गेअर म्हणजे तंबूसारख्या घरांमध्ये येथील लोक राहतात.

फेअरबँक्स (Fairbanks) – अलास्का, USA

अमरिकेतील अतिथंड प्रदेश असलेल्या अलास्का प्रातात हे शहर वसले आहे याठिकाणी हिवाळ्यात तापमान मायनस 30 डिग्रीपर्यंत जाते. मोठ्या रात्री व बर्फाची वादळे येथे कायम येत असतात.

बरो अलास्का, USA

हे अमेरिकेतील सर्वात उत्तरेकडील शहर आहे याठिकाणी काही महिने सूर्यच उगवतच नाही त्‍यामुळे तापमान वजा 30 डिग्रीपर्यंत जाते.

Gray Peacock : चंदेरी रंगाचा मोर पाहिला आहे का?