Gray Peacock : चंदेरी रंगाचा मोर पाहिला आहे का?

Namdev Gharal

भारताच्या इशान्यकडील राज्यांमध्ये एक विषेश पक्षी आढळतो. तो आपल्या सामान्य मोराची जूणू लहान प्रतिकृती असतो. पण रंग अगदीच ग्रे किवा चंदेरी असा वेगळाच

याच्या नावात “Peacock” असले तरी हा मोर नसून ‘फेजंट’ (Pheasant) कुळातील पक्षी आहे. पण याच्या पंखावर असलेले सिल्वर कलरचे डोळे (ocelli) सेम मोठ्या मोरासारखे दिसतात

त्‍यामुळे याला ग्रे पिकॉक म्हटले जाते. आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम या राज्यांमध्ये प्रामुख्याने दाट जंगल, बांबूची झाडे असलेला प्रदेश याठिकाणी आढळतो

हा मोठ्या मोरासारखाच पिसारा फूलवतो पण तो करड्या-तपकिरी रंगाचा असतो. पिसांवर डोळ्यासारखे ठिपके (ocelli) असताता पण आकाराने मोरापेक्षा लहान व सडपातळ असतो

याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे नर पिकॉक तो पंख पसरून वर्तुळाकार नृत्य करतो. हे दृश्य खूपच दुर्मिळ व सुंदर असते

याच्या आवाजाचे वैशिष्ट्ये म्हणजे याचा आवाज तीक्ष्ण आणि जोरात असतो. जंगलात हा आवाज दूरपर्यंत ऐकू येतो

हा पक्षी फार लाजाळू असतो- क्वचितच उघड्यावर दिसतो, याला कॅमेऱ्यात टिपणे अत्यंत अवघड मानले जाते. नेहमी जंगलात गर्द झाडीत बसलेला असतो

किडे, अळ्या, बिया, छोटी फळे हा याचा प्रामुख्याने आहार असतो. जंगलतोड व मानवी हस्तक्षेपामुळे संख्या कमी होत आहे.

याला मोरासारखी मोठी पिसे नसतात याची पिसे लहान, इतर पक्ष्यांसारखी असतात. पण यातील नर पिसे फूलवून नृत्‍य करतो.

Death Apple Tree | जगातील सर्वात विषारी झाडः फळे, पाने एवढेच काय याच्या लाकडाचा धूरही असतो जीवघेणा!