पोर्तुगाजांनी भारतात बटाटे आणि पाव आणला, त्यानंतर खऱ्या अर्थाना वडापावच्या निर्मितीला चालना मिळाली .बटाट्याची भाजी बेसन पिठात मिसळून खाल्यास स्वादिष्ट लागते हे समजल्यानंतर वडापावचा जन्म झाला.बटाट्याची भाजी बेसन पिठात मिसळून त्याचा गोळा करून तळल्यास खरपूस वडा तयार झाला.कमी किंमतीत पोट भरणारा, खरपूस आणि स्वादिष्ट वडापाव अल्पावधीतच सर्वांच्या जिभेवर रेंगाळू लागला .वडापावचा जन्म साधारण 1966 मध्ये मुंबईतील दादरमध्ये झाला .मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनबाहेर अशोक वैद्य यांनी पहिल्यांदा वडापाव बनविल्याचे सांगितले जाते.याचवेळी दादरमधील सुधाकर म्हात्रे यांनीही वडापाव करण्यास सुरुवात केली.मुंबईत वडापाव तयार झाल्यानंतर सुरूवातीला त्याची किंमत केवळ 10 पैसे इतकी होती.वडा पाव महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा भाग बनला असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो .येथे क्लिक करा