महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेला लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.महाबळेश्वर शहरापासून अंदाजे ७ किमी वर लिंगमळा धबधबा आहे .महाबळेश्वरच्या प्रसिद्ध लिंगमळा धबधब्याकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत .पाचगणी - महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरून लिंगमळा कडे जाण्यासाठी एक रस्ता आहे .मुख्य रस्त्यापासून अंदाजे २ किमी वर लिंगमळा धबधबा आहे.मुख्य मेढा रस्त्यामार्गे धबधबा पाहण्यासाठी जाता येते .महाबळेश्वर वनविभागाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपायोजना केल्या आहेत .स्वच्छ परिसर व जांभ्या दगडातील पायऱ्यांचे बांधकाम लक्ष वेधून घेते.वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची धबधबा पाहण्यासाठी मोठी वर्दळ असते .येथे क्लिक करा