Memory Diet : मेंदूला बनवा सुपरफास्ट! या १० नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करा
पुढारी वृत्तसेवा
अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, काही विशिष्ट खाद्यपदार्थ स्मरणशक्ती सुधारण्यास, एकाग्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. जाणून घेवूया या पदार्थांविषयी...
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, ल्युटीन, फोलेट आणि बीटा कॅरोटीन यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन करणार्या वृद्धांच्या ज्ञानात्मक ऱ्हासाचा वेग मंदावतो.
अक्रोडमध्ये असंतृप्त चरबीसह व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ठराविक कालावधीसाठी त्यांचे नियमित सेवन केल्यास मेंदूचे कार्य सुधारते.
तांदूळ, गहू, ओट्स, क्विनोआ यांसारखे संपूर्ण धान्य शरीराला ग्लुकोजचा स्थिर पुरवठा करतात, जो मेंदूचे मुख्य इंधन आहे.
अंड्यांमध्ये कोलीन नावाचे पोषक तत्व असते, ते एसिटिलकोलीन तयार करते. ते स्मरणशक्ती आणि शिकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे न्यूरोट्रांसमीटर आहे.
70% हून अधिक कोको असलेले डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅफिन आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात.
हळदीमध्ये करक्युमिन नावाचे अँटिऑक्सिडंट संयुग असते. ते स्मरणशक्ती तसेच मनःस्थिती सकारात्मक करण्यास मदत करते .
भोपळा, सूर्यफूल, जवस आणि चिया यांसारख्या काही बिया मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि तांबे यांसारख्या घटकांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. हे सर्व मेंदूच्या योग्य कार्यासाठी महत्त्वाचे आहेत.
फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड , विशेषत: डीएचए आणि ईपीए भरपूर प्रमाणात असतात. याच्या नियमित सेवनाने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते.
ब्लूबेरी मध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे मेंदूला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि सूज यापासून वाचवतात.
ग्रीन टी मध्ये कॅफिन आणि एल-थेनाइन असते, जे एकत्रितपणे एकाग्रता आणि लक्ष सुधारू शकतात
येथे क्लिक करा.