World No Tobacco Day|निकोटीनचा मेंदूवर वार! जाणून घ्या तंबाखू व्यसनाचे वैज्ञानिक सत्य

पुढारी वृत्तसेवा

तंबाखू किंवा सिगारेटमधून शरीरात आलेले निकोटीन अवघ्या ७ ते १० सेकंदांत रक्ताद्वारे थेट तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचते.

डोपामाइनचा खोटा आनंद ..! निकोटीन मेंदूत जाताच 'डोपामाइन' हे न्यूरोट्रांसमीटर रिलीज होते. यामुळे तात्पुरते बरे वाटते आणि मूड फ्रेश झाल्यासारखा वाटतो.

मेंदूतील ॲसिटिलकोलीन रिसेप्टर्सना निकोटीन स्वतःकडे खेचून घेते आणि मेंदूच्या नैसर्गिक कार्यात ढवळाढवळ करते.

डोपामाइनची पातळी झपाट्याने खाली आल्यावर मेंदू पुन्हा निकोटीनची मागणी करतो. यातूनच तंबाखूचे व्यसन (Addiction) जडते.

संशोधनानुसार, दीर्घकाळ निकोटीन घेतल्यास मेंदूची नैसर्गिक रचना बदलते. मेंदू निकोटीनशिवाय नीट काम करूच शकत नाही, अशी स्थिती निर्माण होते.

निकोटीनमुळे सुरुवातीला एकाग्रता वाढल्यासारखी वाटते, पण नंतर स्मरणशक्ती कमकुवत होते आणि निर्णय घेण्याची क्षमता मंदावते.

लोकांना वाटते सिगारेटमुळे ताण कमी होतो, पण प्रत्यक्षात निकोटीन न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड आणि नैराश्य सिगारेट ओढल्यावर तात्पुरते शांत होते.

वयाच्या २५ वर्षांपर्यंत मानवी मेंदू विकसित होत असतो. या काळात निकोटीनचे सेवन केल्यास मेंदूच्या कायमस्वरूपी विकासात अडथळा येतो.

तुमचा मेंदू निकोटीनचा गुलाम नाही. इच्छाशक्ती आणि वैद्यकीय मदतीने मेंदूला पुन्हा निरोगी बनवता येते. तंबाखूला म्हणा 'नाही'!

येथे क्‍लिक करा.