Anirudha Sankpal
वर्ल्ड रेकॉर्ड आणि किंमत
पनामाच्या 'हेसिएंडा ला एस्मेराल्डा' फार्ममधील गेशा कॉफीने २०२५ च्या लिलावात १ किलोसाठी २५ लाख रुपयांची विक्रमी बोली मिळवून जगातील सर्वात महागडी कॉफी ठरण्याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' केला आहे.
एक कप ५७,००० रुपयांना
दुबईच्या 'रोस्टर्स स्पेशलिटी कॉफी हाउस'मध्ये या कॉफीच्या एका कपची किंमत सुमारे ५७,००0 रुपये ($६८०) इतकी आहे.
अतिशय दुर्मिळ उत्पादन
या कॉफीची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे हिची दुर्मिळता असून, ही कॉफी विकसित करण्यासाठी तब्बल १३ वर्षांचे संशोधन आणि प्रचंड मेहनत लागली आहे.
सर्वोच्च आंतरराष्ट्रीय रेटिंग
पनामा इंटरनॅशनल जजिंगमध्ये या वॉश्ड गेशा कॉफीला १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत, जी जागतिक कॉफी गुणवत्तेतील सर्वोच्च रँकिंग मानली जाते.
लक्झरी सर्व्हिस
दुबईमध्ये ही कॉफी 'हारियो व्ही६०' (Hario V60) मशीनद्वारे तयार केली जाते आणि विशेष डिझाइन केलेल्या 'एडो किरिको क्रिस्टल ग्लास'मधून श्रीमंत ग्राहकांसाठी सर्व्ह केली जाते.
स्टेटस सिम्बॉल
दुबई, जपान आणि तैवानमधील अब्जाधीश तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या क्लायंटला प्रभावित करण्यासाठी आणि स्वतःच्या स्टेटससाठी ही महागडी कॉफी खरेदी करतात.
अनोखी चव (Flavour)
या कॉफीची चव कडू नसून यात कोको, संत्री, जस्मिन आणि चंदनाचा सुवास येतो; ही कॉफी जशी थंड होते, तशी यात आंबा आणि लिचीसारख्या फळांची चव अधिक गडद होत जाते.
भविष्यात आणखी महागणार
जागतिक स्तरावर श्रीमंतांची वाढती संख्या आणि हवामान बदलामुळे (Climate Change) या दुर्मिळ कॉफी बीन्सचा तुटवडा जाणवत असल्याने, भविष्यात हिची किंमत प्रति किलो २८.७० लाख रुपयांच्या पार जाण्याचा अंदाज आहे.