Curd Health Benefits: दही आरोग्याला फायदेशीर! मात्र खाताना या ४ चुका टाळा

Anirudha Sankpal

1 - साखर किंवा मिठाचा वापर टाळा

दहीत रिफाइंड साखर किंवा पांढरे मीठ टाकल्याने त्यातील 'गुड बॅक्टेरिया' (प्रोबायोटिक्स) नष्ट होतात; गोडव्यासाठी मध, गूळ, मिश्री किंवा चवीसाठी काळे मीठ वापरावे.

Curd Sour Trick | pudhari

2 - रात्री दही खाणे टाळा

सूर्यास्तानंतर दही खाल्ल्याने शरीरात कफ दोष वाढू शकतो, ज्यामुळे सांधेदुखी, कफ आणि श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

canva photo

दुपारची वेळ सर्वोत्तम

दही खाण्यासाठी सकाळची किंवा दुपारची वेळ सर्वोत्तम मानली जाते; सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये याचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Curd Health Risks | pudhari photo

3 - दही गरम करू नये

अनेकदा ग्रेव्हीत दही वापरताना ते गरम केले जाते, परंतु दही गरम केल्याने शरीरात पित्त दोष वाढतो आणि ॲसिडिटी किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

रोज दही खाणे टाळा

दही पचनासाठी जड (हेवी) अन्न असल्याने ते रोज खाणे टाळावे; आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळा दही खाणे शरीरासाठी पुरेसे असते.

चुकीचे अन्नपदार्थ एकत्र करणे (विरुद्ध आहार)

दहासोबत बुंदी, काकडी, मासे, केळी, अंडी, वांगी किंवा खाटी फळे खाणे टाळावे, कारण हा विरुद्ध आहार शरीराला नुकसान पोहोचवू शकतो.

4 - पावसाळ्यात दही नको

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळा हा ऋतू वगळता तुम्ही इतर कोणत्याही ऋतूंमध्ये दह्याचे सेवन करू शकता.

आरोग्यासाठीचे फायदे

दहीत भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रोटीन असते, जे योग्य पद्धतीने खाल्ल्यास पचनक्रिया आणि हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

येथे क्लिक करा