Namdev Gharal
जगात अशी एक महागडी कॉफी आहे की जी एका प्राण्याच्या विष्ठेतून मिळणाऱ्या कॉपी बियांपासून तयार केली जाते, ही कॉफी म्हणजे सिव्हेट कॉफी किंवा कोपी लुवाक असेही म्हटले जाते
ही कॉफी 50 हजार किलोपर्यंत जाते कारण ही तयार करण्याची प्रक्रीया वेगळी आणि किचकट आहे. या कॉफीच्या निर्मितीची प्रक्रिया 'सिव्हेट' (Civet) नावाच्या प्राण्याशी संबंधित आहे
सिव्हेट हा प्राणी कॉफीच्या बागांमध्ये फिरताना सर्वात उत्तम आणि पिकलेली कॉफीची फळे (Coffee Cherries) निवडून खातो.
हे प्राणी फळाचा बाहेरील गर पचवतात, परंतु आतील बी त्यांच्या पोटात पचत नाही. पचन प्रक्रियेदरम्यान, त्यांच्या पोटातील एन्झाइम्स या बियांवर प्रक्रिया करतात. व त्याचा स्वाद वाढतो
या बिया सिव्हेटच्या विष्ठेवाटे शरीराबाहेर टाकल्या जातात. कॉफी उत्पादक ही विष्ठा गोळा करतात.
गोळा केलेल्या बिया स्वच्छ धुतल्या जातात, वाळवल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात, जेणेकरून त्या पूर्णपणे निर्जंतुक आणि वापरासाठी योग्य होतील.
ही कॉफी कारखान्यात बनवता येत नाही. नैसर्गिकरीत्या सिव्हेट प्राण्यांच्या विष्ठेपासून मिळणाऱ्या बियांचे प्रमाण कमी असते
जंगलातून किंवा बागांमधून सिव्हेटची विष्ठा शोधणे, ती गोळा करणे आणि स्वच्छ करणे हे अत्यंत कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे असते
पण सिव्हटच्या पचनसंस्थेतील प्रक्रियेमुळे या कॉफीला एक वेगळा सुगंध आणि चव प्राप्त होते, जी इतर कोणत्याही कॉफीला नसेते तसेच कृत्रिमरित्या तयार करता येत नाही
याचा पुरवठा मर्यादित असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २५,००० ते ५०,००० रुपये प्रति किलो किंवा याच्यापेक्षाही अधिक असू शकते
सिव्हेट हा प्राणी प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशिया: इंडोनेशिया फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि थायलंड देशांमध्ये आढळतो
भारतातील कर्नाटक (कूर्ग), केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधील कॉफीच्या मळ्यांमध्ये हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे येथेही काही प्रमाणात या कॉफीचे उत्पादन घेतले जाते
अनेक ठिकाणी या प्राण्यांना पिंजऱ्यात डांबून फक्त कॉफीची फळे खायला दिली जातात. व त्यापासून बिया मिळवून ही कॉफी करतात, पण ही सिव्हेटसाठी क्रुरता ठरते