पुढारी वृत्तसेवा
जगातील सर्वात मोठं विमान
Airbus A380 हे जगातील सर्वात मोठं प्रवासी विमान आहे. या विमानाची लांबी सुमारे 72.7 मीटर आणि उंची 24 मीटर आहे.
दोन मजल्यांचं आलिशान डिझाइन
हे विमान दोन मजल्यांचं आहे वरचा मजला प्रामुख्याने फर्स्ट आणि बिझनेस क्लाससाठी, तर खालचा मजला इकॉनॉमी क्लाससाठी वापरला जातो.
किती प्रवासी बसू शकतात?
Airbus A380 मध्ये 850 प्रवाशांपर्यंत प्रवास करू शकतात, पण बहुतांश विमानकंपन्या 500-550 आसनांची रचना ठेवतात जेणेकरून आरामदायक प्रवास मिळेल.
या विमानात कोणत्या सुविधा आहेत?
फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी खास सूट, बार, शॉवर स्पा, आणि बेडसारख्या सुविधा असतात. इकॉनॉमी क्लासमध्येही स्क्रीन, चार्जिंग पोर्ट आणि पुरेसं लेगरूम असतं.
सामान्य लोक बसू शकतात का?
होय! हे विमान Emirates, Singapore Airlines, British Airways, Qatar Airways यांसारख्या विमानकंपन्यांकडे आहे. कोणतीही व्यक्ती याचं तिकीट बुक करू शकते.
तिकीट किती असतं?
Airbus A380 चं इकॉनॉमी क्लास तिकीट साधारण ₹60,000 ते ₹1.2 लाखांपर्यंत असतं लांब पल्ल्याच्या फ्लाइटसाठी.
फर्स्ट क्लास सूटचे तिकीट ₹5 लाखांहून अधिकही असू शकतं!
या विमानाचा पहिला प्रवास
Airbus A380 ने आपला पहिला व्यावसायिक प्रवास 2007 मध्ये Singapore Airlines सोबत केला.
का खास मानलं जातं हे विमान?
हे विमान केवळ आकारामुळे नाही तर साउंडलेस इंजिन, इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि आलिशान अनुभवामुळे जगभर प्रसिद्ध आहे.
सध्या कुठे पाहायला मिळतं?
Airbus A380 अजूनही दुबई, लंडन, सिंगापूर, न्यूयॉर्क आणि पॅरिस या मार्गांवर नियमितपणे उड्डाण करतं.