पुढारी वृत्तसेवा
अंड्याला प्रोटिनचा सर्वात सोपा आणि स्वस्त स्रोत मानला जातो.
अंड्याचा पांढरा भाग बॉडी बिल्डिंगसाठी चांगला आहे की बलक आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे प्रदान करतो?
एका अंड्याचा पांढरा भाग अंदाजे 3.6 ग्रॅम प्रथिने आणि फक्त 17 कॅलरीजचा असतो.
लोक बर्याचदा अंड्याचा पिवळा भाग चरबी आहे असे समजून दुर्लक्ष करतात; पण खरे पोषण तिथेच आहे.
अंड्याच्या पांढर्या भागात जास्त प्रथिने असतात; परंतु संपूर्ण पोषणासाठी पिवळा भाग आवश्यक असतो.
एका संपूर्ण अंड्यामध्ये (पांढरा आणि पिवळा भाग) अंदाजे 6 ते 7 ग्रॅम प्रथिने असतात, जे शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे.
संशोधनातून असे दिसून आले आहे की, योग्य प्रमाणात अंडी खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही.
जर तुम्हाला एकंदर आरोग्यदायक आणि स्टॅमिना हवा असेल, तर संपूर्ण अंडे खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
अंड्याचा पांढरा भाग शुद्ध प्रथिने प्रदान करतो, तर बलक हा आवश्यक जीवनसत्त्वे आणि चरबीचा स्रोत आहे.