पुढारी वृत्तसेवा
अंटार्क्टिका खंडाचा बहुतांश भाग व्यापणारे अंटार्क्टिक ध्रुवीय वाळवंट (Antarctic Polar Desert) हे जगातील सर्वात मोठे शीत वाळवंट आहे.
हा खंड सर्वात थंड, सर्वात कोरडा आणि सर्वात जास्त वाऱ्याचा म्हणून ओळखला जातो.
वाळवंटाची व्याख्या उष्णतेवर नाही, तर कोरडेपणावर आधारित आहे. ज्या प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान १० इंच (२५० मिमी) पेक्षा कमी असते, तो प्रदेश वाळवंट मानला जातो.
अंटार्क्टिका वाळवंट असण्याची प्रमुख वैज्ञानिक कारणे अत्यंत कमी पर्जन्यमान हे आहे. खंडाच्या आतील भागात दरवर्षी केवळ सुमारे २ इंच (५० मिमी) इतकेच पर्जन्यमान होते.
या प्रदेशात पेंग्विन, सील, व्हेल आणि समुद्री पक्षी आढळतात; परंतु जमिनीवरील वनस्पती जवळजवळ अस्तित्वात नाही.
उंच पठारावरून खाली येणाऱ्या थंड, घनदाट हवेमुळे येथे तीव्र कॅटाबॅटिक वारे तयार होतात. यामुळे येथे वाऱ्याची गती खूप जास्त असते. या खंडावरील बर्फ तापमान खूप थंड असल्याने वितळत नाही, म्हणून अनेक हजारो वर्षांपासून साचत गेला आहे.
अंटार्क्टिका हे जगातील सर्वात जास्त वाऱ्याच्या ठिकाणांपैकी एक आहे. जोरदार वारे काही भागांमध्ये बर्फ साचू देत नाहीत, ज्यामुळे कोरडेपणा वाढतो.