पुढारी वृत्तसेवा
तुम्हाला माहीत आहे का, जगातील कोणत्या देशाची ट्रेन सर्वात वेगवान धावते? डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ती नजरेआड होते. या ट्रेनचा वेग अक्षरशः विजेसारखा आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारत रेल्वे क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. अनेक आधुनिक गाड्या रुळावर आल्या आहेत.
सध्या आपल्याकडे वंदे भारत, अमृत भारत, दुरांतो आणि राजधानी सारख्या हाय-स्पीड ट्रेन्स प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करत आहेत.
जागतिक पातळीवर सर्वात वेगवान रेल्वेत कोणता देश अव्वल स्थानी आहे?
जगात असे काही प्रगत देश आहेत, जिथल्या ट्रेन अवघ्या २ ते ३ तासांत ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सहज पार करू शकतात. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या देशांनी तंत्रज्ञानात मोठी क्रांती केली आहे.
सध्या जगातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून 'CR450' कडे पाहिले जात आहे. या ट्रेनने वेगाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
ही हाय-स्पीड ट्रेन चीनची आहे. नुकत्याच झालेल्या चाचणी दरम्यान, या ट्रेनने ताशी तब्बल ४५३ किमी (काही चाचण्यांमध्ये ताशी ८९६ किमीच्या इतका उच्चांक गाठला आहे.
यापूर्वी हा जागतिक विक्रम जपानच्या 'L0 मालिकेतील' मॅग्लेव्ह ट्रेनच्या नावावर होता. ती ट्रेन ताशी ६०३ किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र, चीनच्या नव्या तंत्रज्ञानाने जपानलाही मागे टाकले आहे.
अवघ्या चीनची CR450 ट्रेन अवघ्या ४ मिनिटे ४० सेकंदात ताशी ३५० किमीचा वेग पकडू शकते. जरी नियमित प्रवासादरम्यान तिचा वेग ताशी ४०० किमी ठेवला जाणार असला, तरी हा वेग जगाला थक्क करणारा आहे.