पुढारी वृत्तसेवा
प्राणायाम हे शरीर आणि मन यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा मानले जाते.
प्राणायामाचा एक विशेष प्रकार असलेला 'भ्रामरी प्राणायाम' आरोग्यासाठी अधिक व्यापक फायदे देतो.
संस्कृतमध्ये 'भ्रामरी' या शब्दाचा अर्थ 'भ्रमर' किंवा मधमाशी असा होतो. म्हणून याला भ्रामरी हे नाव पडले आहे. जाणून घेवूया या प्राणायामाचे पाच फायदे...
संशोधनानुसार, श्वास सोडताना निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती सामान्य श्वसनापेक्षा १५ पटीने वाढते. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि हृदय व श्वसनसंस्था निरोगी राहते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते: नायट्रिक ऑक्साईड हे नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करते. संशोधनानुसार, भ्रामरीसारख्या सरावामुळे वाढलेले नायट्रिक ऑक्साईड शरीराची संसर्गाविरुद्धची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या मजबूत करते.
तणाव आणि चिंता कमी होऊन मन शांत होते: या प्राणायामातील गुंजन 'पॅरासिम्पेथेटिक' मज्जासंस्थेला कार्यान्वित करते, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते आणि सेरोटोनिन व डोपामाइन सारख्या 'हॅप्पी हार्मोन्स'ची पातळी वाढते.
गुंजनामुळे निर्माण होणारी कंपने सायनसचा मार्ग मोकळा करण्यास, कफ कमी होण्यास आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यास मदत करतात. ज्यांना ॲलर्जी किंवा सायनसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा सराव अत्यंत लाभदायक ठरतो.
भ्रामरी प्राणायामामुळे मेंदू आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. तसेच मेंदूतील 'गॅमा लहरी' उत्तेजित होऊन मानसिक स्पष्टता मिळते.
तुम्हालाही उत्तम आरोग्य मिळवायचे असेल, तर आपल्या दैनंदिन दिनचर्येत 'भ्रामरी प्राणायामाचा' समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.