पुढारी वृत्तसेवा
वाचनाची आवड असलेले डिजिटल स्क्रीन की पुस्तक या दोन गटात विभागले असून, दोन्हींचे स्वतःचे असे खास फायदे आहेत!
छापील पुस्तके वाचताना कोणतेही डिजिटल नोटिफिकेशन तुम्हाला त्रास देत नाही. यामुळे एकाग्रता वाढते आणि डोळ्यांवर ताण कमी येतो.
ई-बुक्समुळे तुम्हाला जड ओझी वाहण्याची गरज नाही. एका Kindle किंवा फोनमध्ये हजारो पुस्तके सोबत नेणे आता सोपे झाले आहे.
छापील पुस्तके ही केवळ माहिती नसून त्या आठवणी असतात. ती कपाटात सजवून ठेवण्यात एक वेगळाच आनंद असतो.
ई-बुक्समध्ये असणारे 'Built-in light' आणि 'Dark mode' फिचर रात्रीच्या वेळी कोणालाही त्रास न देता वाचन करण्यास मदत करतात.
ई-बुक्समुळेझाडांची कत्तल वाचते, मात्र दुसरीकडे ई-कचरा (E-waste) वाढतोय. छापील पुस्तके रिसायकल होऊ शकतात. दोन्हीचे पर्यावरणावर वेगवेगळे परिणाम होतात.
काही संशोधनानुसार, छापील पुस्तकात वाचलेली माहिती मेंदू जास्त काळ लक्षात ठेवतो. कागदाचा स्पर्श आणि पानांची हालचाल मेंदूला कथेचा क्रम लक्षात ठेवण्यास मदत करते.
शेवटी माध्यम कोणते आहे याला नसून, तुम्ही वाचताय याला महत्त्वआहे!