Desk Job Health Issue: दिवसातील ८ ते ९ तास डेस्क जॉब करता? घरी आल्यावर करा या ५ गोष्टी

Anirudha Sankpal

ऑफिस किंवा घरी सलग ८-९ तास डेस्कवर बसून काम केल्याने शरीराला सुस्ती, थकवा, मान-कंबरदुखी आणि मानसिक तणाव जाणवू शकतो.

काही सोप्या सवयींमुळे दिवसभराच्या डेस्क जॉबनंतर शरीराला ताजेतवानेपणा आणि संतुलन राखण्यास मदत होते.

१. पाय वर उचलणे

पाठ टेकून झोपा आणि पिंडऱ्या खुर्ची किंवा उंच उशीवर ठेवून ६० सेकंद तसेच राहा, यामुळे पायातील जडपणा व थकवा कमी होण्यास मदत होते.

२. हात उबदार करून डोळ्यांना आराम देणे

तळवे एकमेकांवर घासून गरम करा आणि दाब न देता बंद डोळ्यांवर १५-२० सेकंद ठेवून स्क्रीनमुळे आलेला डोळ्यांचा ताण कमी करा.

३. श्वास नियमित करणे

खांदे सैल सोडून आरामदायक स्थितीत बसा आणि श्वास घेण्यापेक्षा सोडताना जास्त वेळ घेत ५-६ वेळा शांत श्वास घ्या, ज्यामुळे मन व शरीर शांत होते.

४. बोटे आणि मनगट ताणणे

सतत टाायपिंग किंवा माऊस वापरल्याने येणारा ताण कमी करण्यासाठी बोटे पसरून सैल सोडा आणि मनगट हळूहळू गोलाकार फिरवा.

५. छाती आणि खांदे ताणणे

पुढे झुकून बसल्यामुळे होणारा ताण कमी करण्यासाठी पाठीमागे बोटे गुंतवून खांदे मागे ओढा, छाती किंचित वर उचला आणि १५-२० सेकंद तसेच राहा.

नियमित व्यायामासोबत या छोट्या सवयी अंगीकारल्यास दीर्घकाळ बसून राहण्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

येथे क्लिक करा