स्वालिया न. शिकलगार
दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.
कोमट पाण्यासोबत घेतलेली थोडी दालचिनी गॅस, पोट फुगणे कमी करण्यास फायदेशीर आहे.
दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात.
पण फक्त दालचिनीचा चहा प्यायल्याने आपोआप वजन झपाट्याने कमी होत नाही.
हा चहा मेटाबॉलिझम आणि साखरेचे संतुलन राखून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत करतो.
सोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेणं महत्वाचे आहे
दालचिनीतील गुणधर्मामुळे अपचनाचा त्रास कमी होतो
योग्य आहार आणि व्यायामासोबत घेतल्यास तो वजन नियंत्रणास हातभार लावू शकतो.
रोज अर्धा चमचाहून कमी प्रमाण सामान्यतः पुरेसे मानले जाते.
जास्त प्रमाणात दालचिनी घेतल्यास पोटाचे विकार किंवा इतर त्रास होऊ शकतात.