'वायर्ड' (Wired) की 'ब्लूटूथ' (Bluetooth) कोणते इअरफोन अधिक चांगले ? तज्ञ काय सांगतात

Namdev Gharal

सध्या सर्वांसाठीच स्मार्टफोन गरजेचा झाला आहे. याबरोबर यासाठीचे गॅझेटही महत्‍वाची ठरतात यामध्ये गाणी ऐकण्यासाठी, ऑनलाईन मिटींगसाठी, कॉलसाठी उपयोग येतात ते म्हणजे इअरफोन

या इअरफोनमध्ये हजारो प्रकार आले आहेत यामध्ये महत्‍वाचे म्हणजे वायर्ड आणि ब्लुटूथ हे दोन महत्‍वाचे. अनेकवेळी इअरफोन कोणता वापरायचा याचा गोंधळ असतो. खालील मुद्यांद्वारे समजून घेऊ

वायर्ड इअरफोन्स: यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन नसते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने, विशेषतः दीर्घकाळ वापरणाऱ्यांसाठी हे सर्वात सुरक्षित मानले जातात.

ब्लूटूथ इअरफोन्स: हे 'नॉन-आयोनाइजिंग' रेडिएशन उत्सर्जित करतात. जरी हे रेडिएशन मोबाईल फोनपेक्षा १० ते ४०० पट कमी असले, तरी तज्ञ दीर्घकाळ वापराबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात.

डॉक्टरांचे मते कान खराब होण्याचा संबंध रेडिएशनपेक्षा 'आवाजाच्या तीव्रतेशी' (Volume) जास्त असतो. मग ते वायर्ड असो किंवा ब्लूटूथ आवाजाची पातळी नेहमी ६०% पेक्षा कमी ठेवावी.

अलीकडील काही अभ्यासांनुसार, वायर्ड इअरफोन्समुळे कानाचा संसर्ग होण्याचे प्रमाण थोडे जास्त असू शकते. कारण आपण वायर्ड इअरफोन्स खिशात किंवा बॅगेत कुठेही ठेवतो, ज्यामुळे त्यावर धूळ आणि बॅक्टेरिया बसतात.

ब्लूटूथचा फायदा: ब्लूटूथ इअरबड्स सहसा चार्जिंग केसमध्ये सुरक्षित राहत असल्याने ते अधिक स्वच्छ राहतात.

२०२४ मधील एका प्राथमिक अभ्यासानुसार, जे लोक दिवसातून ३ तासांपेक्षा जास्त काळ ब्लूटूथ इअरफोन्स वापरतात, त्यांच्यात थायरॉईडच्या गाठी (Thyroid nodules) होण्याचा धोका किंचित वाढू शकतो.

कॉलसाठी ब्लूटूथ चांगले: मोबाईल थेट कानाला लावण्यापेक्षा ब्लूटूथ इअरफोन्स वापरणे जास्त सुरक्षित आहे, कारण यामुळे मोबाईलचे उच्च रेडिएशन मेंदूपासून लांब राहते.

दीर्घ वापरासाठी वायर्ड उत्तम: जर तुम्हाला तासनतास ऑफिस मिटिंग किंवा अभ्यास करायचा असेल, तर 'वायर्ड' इअरफोन्स निवडा.

तज्ञांच्या मते, वायर्ड इअरफोन्स ब्लूटूथच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि 'अनकॉम्प्रेस्ड' आवाज देतात. ब्लूटूथमध्ये सिग्नल ट्रान्सफर करताना आवाजाची क्वालिटी किंचित कमी होते.

Cough Bronchitis |छातीत कफ साचला आहे..... बस खाऊची 4 पाने पुरेशी आहेत!