Cough Bronchitis |छातीत कफ साचला आहे..... बस खाऊची 4 पाने पुरेशी आहेत!

Namdev Gharal

सध्या बोचऱ्या थंडीमुळे अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी खोकला कफ सायनस यांनी अनेकांचा जीव गुदमरत आहे  

थंडीच्या दिवसात हवेत प्रदूषणाची पातळी वाढते सर्दी सतत झाल्याने कफ छातीत साठून राहतो. अनेकांना पुढे अनेक दिवस हा कफ प्रचंड त्रास देत राहतो

या कफासाठी अनेक उपाय करुन लोक थकतात पण एक घरगुती असलेला पण आर्युवेदाचीही परंपरा असलेला एक उपाय यासाठी रामबाण ठरु शकतो

हा उपाय आहे खाऊच्या पानाचा नागवेल यालाच आपण खाऊचे पान म्हणतो. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत हे आपण जाणतोच हेच पान कफासाठी अंत्‍यत उपयुक्त ठरु शकते

या पानामध्ये नैसर्गिक उष्ण गुणधर्म असतात. याच गुणामुळे छातीत साचलेला कफ वितळून हळू हळू शरीराच्या बाहेर पडतो

दुसरे म्हणजे या पानामध्ये ॲन्टीबॅक्टेरीअल व अन्टीइन्फलमेंटरी गुण असतात जे श्वसनमार्गातील सूज कमी करते जंतू संसर्ग कमी करतो व कोरडा खोकला व कफ दोन्हीत आराम देतो

यासाठी करावे काय 3 ते 4 खाऊची पाने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात 2 कप पाणी घ्या त्‍यात ही पाने टाका व पाणी अर्धे होईल इतके उकळून घ्या

बस तुमचा घरगुती काढा तयार इतर काही प्रकार न करता. हे पाणी कोमट असताना दिवसातून 1 वेळा घ्यायचे आहे

शक्यतो दिवसाच्या सुरवातीला किंवा रात्री झोपताना याचे सेवन अधिक फायदाचे ठरते. चार ते पाच दिवस हा उपाय केला की बसं कफ हळू हळू गायब होऊन जाईल

सध्या अतितीव्र ॲन्टीबायोटीक, रासायनिक औषधांचा शरिरावर विपरीत परिणाम होत असतो. अशावेळी अशा घरगुती उपायांनी आजार जाणे कधीही फायदाचे

Cerumen | कानात मळ का तयार होतो? तो काढणे योग्य की अयोग्य?