पुढारी वृत्तसेवा
थंडी सुरू झाली आहे, या दिवसांत शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, चला जाणून घेऊया घरगुती उपाय.
थंड पाणी टाळा, कोमट पाणी पिल्याने शरीराच तापमान संतुलीत राहत आणि सर्दी खोकला दूर राहतो.
स्वेटर, मोजे आणि कानटोपी वापरा. शरीराचे तापमान थंड राहू नये म्हणून संपूर्ण शरीर झाकून ठेवा.
थंडीमध्ये त्वचा कोरडी होते मॉइश्चरायझर आणि ओठांसाठी लिपबाम वापरा तसेच भरपूर पाणी प्या.
थंडीमुळे आळस येतो, पण थंडीच्या दिवसात थोडा हलका व्यायाम आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी गरजेची आहे.
पौष्टीक सूप, गरम हळदीचे दूध, गुळ, तूप आणि ड्रायफ्रुटस यांचा आहारात समावेश करा, हे शरीराला उष्णता देतात.
"स्वस्थ रहा, ऊबदार रहा आणि निरोगी राहा".