पुढारी डिजिटल टीम
हिवाळ्यात सकाळी एक कप गरम चहा प्यायल्याने बरं वाटतं. पण चहा बनवताना आपण नेहमी चुकीच्या पद्धतीने बनवतो.
चहा नीट बनवला नाही तर ना चव येते, ना मूड चांगला राहतो. म्हणून चहा बनवण्याची योग्य पद्धत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
शेफ संजीव कपूर सांगतात, प्रत्येक घटक योग्य वेळी पाण्यात उकळला पाहिजे. यामुळे मसाल्यांची चव पूर्णपणे पाण्यात उतरते.
आले, तुळस, लेमनग्रास, लिंबू, लवंग, इलायची हे नैसर्गिक औषधं आहेत.
2 कप पाणी गरम करा. त्यात लेमनग्रासच्या 2 स्टिक्स घाला आणि थोडं उकळू द्या.
आता त्यात आल्याचे तुकडे, लिंबाचे स्लाइस, तुळशीची पानं, लवंग, इलायची घालायची आणि पाणी चांगलं उकळू द्यायचं.
उकळी आल्यावर ½ चमचा चहा पावडर घाला. काही मिनिटांनी गॅस बंद करा.
कपात मध घालून चहा गाळा.
हर्बल चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते, शरीरातील सूज आणि इन्फेक्शन कमी होते, शरीर उबदार राहते आणि ऊर्जा मिळते.