अंजली राऊत
काहीजण चहासोबत बिस्किट हलके आणि आरोग्यदायी मानले जाते. परंतु हे तंबाखूइतकेच धोकादायक आहे. हो, चहासोबत बिस्किटे खाणे हा आरोग्यदायी पर्याय नाहीच.
बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक बिस्किटे ही रिफाइंड पीठ, जास्त साखर, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जने भरलेले असतात. चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. तसेच त्याचे इतरही अनेक तोटे आहेत.
चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने या समस्या उद्भवू शकतात. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने अचानक ऊर्जा कमी होऊ शकते. कारण बिस्किटांमध्ये रिफाइंड पीठ, साखर असते, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि नंतर क्रॅश होऊन थकवा येतो.
चहा आणि बिस्किटे यांचे मिश्रण पोटासाठी चांगले नाही. बिस्किटे खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि पोटफुगी होऊ शकते. याचे कारण म्हणजे त्यात असलेले रिफाइंड पीठ, साखर आणि बहुतेक करुन मैदा पचत नाहीत आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो
चहामध्ये कॅफिन आणि साखर असते. बिस्किटांमध्ये रिफाइंड पीठ, Unhealthy fats आणि साखर भरपूर असते. ते खाल्ल्याने साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते.
चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने वजन वाढू शकते. बिस्किटांमध्ये कॅलरीज, मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट्स जास्त असतात, जे शरीराला जास्त पोषण देत नाहीत परंतु चरबी होण्यास हातभार लावतात. त्यामुळे चयापचय मंदावतो, ज्यामुळे वजन वाढते.