थंडीत वारंवार तोंड येतंय? असे का होतं? 'हे' आहेत साधेसोपे उपाय

मोनिका क्षीरसागर

हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे शरीरातील ओलावा कमी होतो, ज्यामुळे तोंडातील नाजूक त्वचेला जखमा होऊन तोंड येते.

थंडीत तहान कमी लागते, परिणामी पाणी कमी प्यायल्याने शरीरात उष्णता वाढते आणि तोंड येण्याचा त्रास होतो.

हिवाळ्यात आपण अनेकदा जड किंवा तेलकट पदार्थ खातो, ज्यामुळे पोट साफ होत नाही आणि उष्णतेमुळे तोंड येते.

अन्नातून योग्य प्रमाणात ब-१२ किंवा लोह न मिळाल्यास तोंड वारंवार येण्याची समस्या उद्भवू शकते.

 तोंड आल्यास मिठाच्या कोमट पाण्याने दिवसातून २-३ वेळा गुळण्या केल्यास जखमा लवकर भरून येतात.

तोंड आलेल्या जागी मध लावल्याने दाह कमी होतो आणि नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे आराम मिळतो.

रात्री झोपताना तोंड आलेल्या भागावर साजूक तूप लावल्याने थंडावा मिळतो आणि वेदना कमी होतात.

या काळात जास्त तिखट, मसालेदार आणि गरम पदार्थ खाणे टाळावे जेणेकरून तोंडातील जखमांना अधिक त्रास होणार नाही.

येथे क्लिक करा...