गर्भवतींनी दुधातून केसर खाल्यास होतील 'हे' भन्नाट फायदे

पुढारी वृत्तसेवा

गरोदरपणात अनेक महिलांना गॅस आणि अपचनाचा त्रास होतो. दुधात केसर टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

हार्मोनल बदलांमुळे होणारी चिडचिड किंवा नैराश्य कमी करण्यासाठी केसर गुणकारी आहे. हे शरीरात 'सेरोटोनिन' वाढवते, ज्यामुळे मन प्रसन्न राहते.

केसरमध्ये पोटॅशियम आणि क्रोसेटिन असते, जे गरोदरपणात रक्तदाब (Blood Pressure) सामान्य ठेवण्यास मदत करतात.

गरोदरपणात रात्री वारंवार झोप मोड होत असेल, तर झोपण्यापूर्वी कोमट केशरयुक्त दूध प्यावे. यामुळे शांत आणि गाढ झोप लागते.

गरोदरपणात पाय आणि कंबर दुखीचा त्रास जाणवतो. केसरमध्ये दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म असल्याने स्नायूंना आराम मिळतो.

केसरमध्ये लोहाचे (Iron) प्रमाण असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि ॲनिमियाचा धोका कमी करण्यास मदत करते.

गरोदरपणात त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. केसरयुक्त दूध प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

साधारणपणे गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीपासून (५ व्या महिन्यापासून) डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून २-३ काड्या केसर दुधात टाकून घेणे फायदेशीर ठरते.

येथे क्लिक करा...