मोनिका क्षीरसागर
मूग डाळीचे सूप पचायला अत्यंत हलके असते, ज्यामुळे थंडीत मंदावलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते, जे शरीरातील स्नायूंना बळकटी देते आणि ऊर्जा टिकवून ठेवते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे हे सूप प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन घटवण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसात होणारे सर्दी-खोकल्यासारखे आजार रोखण्यासाठी मूग डाळीचे सूप शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.
गरम गरम मूग डाळीचे सूप प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक उष्णता वाढते आणि थंडीपासून संरक्षण मिळते.
पिवळी मूग डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये हळद, मीठ आणि हिंग घालून मऊ शिजवून घ्यावी.
कढईत थोडे तूप गरम करून त्यात जिरे, आले-लसूण पेस्ट आणि मिरी पूड घालून शिजवलेली डाळ त्यात मिसळावी.
चवीनुसार लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून हे पौष्टिक सूप गरमागरम आस्वाद घ्यावा.