अविनाश सुतार
हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी बाजरीचे सूप हा उत्तम पर्याय आहे
बाजरीच्या सूपमधून लोह, फॉस्फरस हे घटक मिळतात. यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते
हिवाळ्याच्या दिवसांत बाजरीचे सूप घेतल्यास पचनक्रिया सुरळीत राहते. यात न विरघळू शकणारे फायबर असतात. त्यामुळे भूक लागत नाही
बाजरीच्या सूपमधून शरीरात आवश्यक ऊर्जा निर्माण होते. ओमेगा-3 हे फॅटी अॅसिड मिळते. हदय निरोगी आणि सुरक्षित राहाण्यासाठी हा घटक महत्त्वाचा असतो
थंडीत नियमित वाटीभर बाजरीचे सूप घेतल्यास स्मरणशक्ती आणि शारीरिक ताकद वाढते
बाजरीच्या सुपात न विरघळू शकणारे फायबर आणि हळूहळू पचणारे स्टार्च असल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही
बाजरीत गुंतागुंतीचे कार्बोदके असतात, त्यामुळे ते हळूहळू पचतात. यामुळे बाजरीचे सूप घेतल्यास पोट भरल्याची जाणीव लवकर होते
बाजरीच्या सुपात न विरघळू शकणारे फायबर असतात. हे फायबर पोटात जाऊन प्रोबायोटिक सारखे काम करतात
शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साइड वाढून पेशींचे होणारे नुकसान बाजरीच्या सुपामुळे टाळता येते